आखिल भारतीय मराठा महासंघ पोलादपूर कार्यकारिणी निवड सभा संपन्न
पोलादपूर(नितीन कळंबे)दि.१०-आखिल भारतीय मराठा महासंघ पोलादपूर
कार्यकारिणी निवड सभा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.देसाई सर यांच्या उपस्थितीत
पार पडली.
पोलादपूर तालुका अध्यक्ष पदावर कोंढवी येथील तरुण कार्यकर्ते
श्री.दिनेश शंकर निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.उपाध्यक्ष पदावर कोतवाल
पंचक्रोशीतील श्री.महेश मनोहर दरेकर तसेच बोरघर येथील श्री.विठ्ठल दगडू पार्टे
यांची निवड करण्यात आली.कोंढवी विभागातून देवपुरचे श्री.महादेव धोंडू शिंदे यांची
खजिनदार पदी,श्री.भरत चिमाजी चोरगे(साखर),श्री.राजेश रामचंद्र डांगे(कापडे विभाग)
यांची सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली.श्री.संतोष विक्रमराव मोरे(पैठण),श्री.अनंत
विठ्ठल घाडगे(करंजे),श्री.विठ्ठल रघुनाथ भिलारे(दिवील),श्री.रवींद्र नारायणराव
मोरे(कोंढवी),श्री.मंगेश राघोबा पवार(पार्लेवाडी),यांची जनसंपर्क प्रमुख पदावर
निवड करण्यात आली.कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांच्या निवडीमुळे संघटनेची आगामी वाटचाल यशस्वी
होईल असा विश्वास हितचिंतक,कार्यकर्ते,पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
0 comments
Post a Comment