Monday, July 28, 2014

मृदंगाचार्य सुनील मेस्त्री जपताहेत मेस्त्री घराण्याची परंपरा

मृदंगाचार्य सुनील मेस्त्री जपताहेत मेस्त्री घराण्याची परंपरा


-by Nitin Kalambe (8446329925)

एखादे शस्त्र,अस्त्र शिकताना ते शरीराचा भाग झाले पाहिजे अशी धारणा शिकणाऱ्याने ठेवली पाहिजे.त्याचप्रमाणे एखादे वाद्यसुद्धा  शरीराचा एक घटक बनू शकते याची खात्री रामदादा मेस्त्री यांच्या चरित्राचं अवलोकन केल्यावर दिसून येते.रात्री झोपल्यावर सुद्धा त्यांची बोटे हृदयाच्या ठोक्यावर नर्तन करीत असत.कधी कधी तर स्नान करतानाच ते वाजवण्यात इतके गर्क होत कि आपले स्नान चालू आहे याचा त्यांना विसर पडे मग कुणीतरी आठवण करून दिल्यावर ते भानावर येतं.साटमबुवा यांच्याकडे पखवाजाचं शास्त्रसुद्ध शिक्षण घेतलेल्या रामदादा मेस्त्री यांनी स्वत:ची स्वतंत्र शैली निर्माण केली.शंकर मेस्त्री आणि राम मेस्त्री या बंधुद्वयींनी उभा महाराष्ट्र आपल्या पखवाज वादनाने मंत्रमुग्ध केला.राम मेस्त्री यांनी आपल्या आयुष्यात पंडित भीमसेन जोशी यांची साथ केली,आकाशवाणीवर पखवाज वादनाचे केले, गजझंपा हा ताल वाजून हत्ती घोडे नाचवले इतकेच नव्हे तर जपानमध्ये जाऊन त्यांनी पखवाज या वाद्याची जपान्यांना भुरळ घातली.त्यांच्या शिष्यांमध्ये त्यांचा किती आदर केला जात होता हे एका उदाहरणावरून सहज स्पष्ट होण्यासारखे आहे.नारायण केसरकर हे रामदादा मेस्त्री यांच्याकडे पखवाज शिकायचे.रामदादांनी त्यांना सांगितले “हे बघ नारायण,तुला अजूनही खूप शिकायचे आहे तेव्हा मी सांगितल्याशिवाय तू समाजामध्ये वाजवायला बाहेर पडू नकोस”.काही काळाने रामदादांचे निधन झाले.कालपरत्वे नारायण केसरकर यांनी वादनात खूप प्रगती केली त्यांच्या वादनातून राम मेस्त्री यांचे वादन प्रतिबिंबित होते असं सुनील मेस्त्री सांगतात.परंतु “मी सांगितल्याशिवाय समाजात वाजवू नकोस” हा गुरूंचा आदेश नारायण केसरकरांनी गुरु गेल्यानंतरही पाळला.इतकी उच्च कोटीची कला हातात असूनसुद्धा गुरुवाक्य प्रमाण मानून ह्या शिष्याने कलियुगात गुरु-शिष्याचं आदर्श म्हणवलं जाईल असं उदाहरण समाजापुढे ठेवल आहे.”धन्य तो गुरु आणि धन्य तो शिष्य !”
रामदादा मेस्त्री,शंकर मेस्त्री यांच्या उत्कर्षाच्या काळात त्यांनी अनेक विद्यार्थी तयार केले.आताचे आघाडीचे पखवाज वादक प्रताप पाटील हे राम मेस्त्री यांचेच शिष्य.समाजाला भारावून टाकणार त्याचं वादन पाहून लहानग्या सुनीलला पखवाज शिकण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली.”काका आज अख्या महाराष्ट्रात विद्यार्थी तयार करता आहात पण तुम्ही मला कधी पखवाज शिकवणार ?” असा प्रश्न सुनीलने काकांना विचारला.तेव्हा राम मेस्त्रींनी जे उत्तर दिले ते आजही सुनील मेस्त्रींना जसेच्या तसे आठवते.ते म्हणाले “हे बघ सुनील,तुला पखवाज शिकवायची काहीच आवश्यकता नाही,तुझ्या रक्तातच ती कला भिनली आहे,तुला मी दोन वर्ष जरी शिकवले तरी तू असा तयार होशील की पखवाज वाजवण्यात तू मलाही मागे टाकशील ” आज हेच शब्द आशीर्वाद रूपाने ग्रहण करून सुनील मेस्त्रींची वाटचाल चालू आहे.
गावाकडे प्राथमिक शिक्षण घेऊन सुनील मेस्त्री चरितार्थासाठी घाटकोपर येथे आपल्या अंगभूत कलेचा वापर करून उत्तम फर्निचर बनवू लागले.येथेच त्यांना नारायण केसरकर यांच्याविषयी माहिती मिळाली त्यांचे वादन पाहून आता आपणही त्यांच्याकडे शिकायला जावे अशी सुप्त इच्छा त्यांच्या मनात आकार घेऊ लागली.अखेर नारायण केसरकर यांच्याकडे त्यांचे प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झालीच.मुळच्या हिऱ्याला पैलू पडू लागले.गुरूंनी एक बोल शिकवावा आणि शिष्याने लगेच त्याची चौपट करून वाजवून दाखवावा असा प्रकार होऊ लागला.शेवटी एक दिवशी नारायण केसरकर म्हटले “सुनील,यापुढे मी तुला शिकवणार नाही,आता वेळ आली आहे,तू तुझ्या मूळ घराण्याकडे परत जा”.गुरुजींचा आशीर्वाद घेऊन सुनील मेस्त्री आपले काका शंकर मेस्त्री यांच्याकडे शिक्षण घेऊ लागले.दऱ्याखोर्यातून खळखळत,मेहनत घेऊन वाहत आलेलं पाणी मूळ समुद्राला मोठ्या आनंदात मिळालं,एकरूप झालं.काकांनी जीव लावून आपल्या पुतण्याला शिकवलं,अजूनही शिकवत आहेत.रक्ताच्या नात्यांचा हा मर्मबंध गुरु-शिष्याच्या नात्यात परावर्तीत झाला.
सूर्याला ढगांनी कितीही झाकोळले तरीसुद्धा स्व:सामर्थ्याने तो धुकट सारून आपल्या ठायीच्या तेजाने प्रकाश फाकू लागतो.त्याचप्रमाने सुनील मेस्त्री यांच्या वादनाने संगीतरुपी आसमंत दरवळून जाऊ लागला.गुरुवर्य फणसे बाबा घाटकोपर येथे सुनील मेस्त्रींचे वडील भाऊ मेस्त्रींना म्हणाले “तुमच्या सुनील ने आश्चर्यकारक अशी प्रगती केली आहे त्याचं वादन ऐकून जणू काही रामदादा मेस्त्री वाजवत आहेत असाच भास होतो तेव्हा तुमचा हा मुलगा समाजात आमच्यासोबत साथीला हवा”.भाऊ मेस्त्रींनी क्षणाचा विचार न करता त्यांना संकल्पपूर्वक उत्तर दिले “आज महाराष्ट्रात मेस्त्री बंधूद्वयींनी स्वत:चे घराणे निर्माण केले.आज मी वादन करतो परंतु त्यांच्याइतके शिक्षण माझे नाही त्यांची परंपरा सांभाळण्याची ताकद माझ्या वादनात नाही तेव्हा माझ्या या मुलाने राम मेस्त्री,शंकर मेस्त्रींचा पखवाज वाजवावा अशी माझी इच्छा आहे.ज्या पखवाजावरून रामदादा,शंकरदादा खाली बसतील तोच पखवाज सुनीलने वाजवावा,हा आज तुमच्यासमोर मी माझा मुलगा समाजाला वाहिला”.भाऊ मेस्त्रींच्या चेहऱ्यावर एक अपूर्व समाधान होते,म्हतारपणाची काठी वगैरे न मानता किंवा स्वत:चा कोणताही वैयक्तिक स्वार्थ न पाहता या माणसाने आपला पोटचा मुलगा समाजासाठी वाहिला होता,एक संकल्प त्यादिवशी सिद्धीस गेला आणि सुनील मेस्त्रींच्या रूपाने एक हिरा आज वारकरी संप्रदायाला आपल्या अंगच्या प्रकाशाने तालब्रह्मात न्हाऊ घालतो आहे.
यानंतर सुनील मेस्त्रीनी मागे वळून पहिले नाही.उत्तरोत्तर त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावता राहिला.अगणित प्रसिद्धी मिळून त्यांचे पाय जमिनीवरच राहिले.कलेच्या अहंकार न बाळगता माळ धारण करून वारकरी झाले.कोणत्याही मानधनाची त्यांनी कधीच अपेक्षा केली नाही.आज मानधनासाठी अडून बसणाऱ्या कलाकारांनी सुनील मेस्त्री यांच्या निस्वार्थी सेवेचा आदर्श ठेऊन वाटचाल करायला हवी.आज मुंबई,पुणे,पोलादपूर,महाड असे त्यांचे क्लासेस चालू आहेत परंतु एकाही विद्यार्थ्याकडे त्यांनी कधीही फी मागितली नाही.कलियुगात हि गोष्ट फार दुर्लभ मानावी लागेल.कलेचा बाजार त्यांनी कधीच मांडला नाही याऐवजी समाजाची सेवा म्हणून त्यांनी ही कला जोपासली,वाढवली.आपल्यामुळे आपल्यापर्यंत चालत आलेल्या परंपरेला बाधा पोचणार नाही याची त्यांनी पावलो-पावली काळजी घेतली.आज तालुक्यात त्यांच्याविषयी ज्या आदराने चर्चा चालतात हे त्यांच्या या वैराग्यरुपी सेवेचं फलित आहे.

     

महाडमध्ये एस.टी.बस –टाटा लक्झरीची समोरासमोर टक्कर

महाडमध्ये एस.टी.बस –टाटा लक्झरीची समोरासमोर टक्कर

१९ प्रवासी जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक


पोलादपूर(नितीन कळंबे) – गोरेगाव स्थानकातून सकाळी आठ वाजता सुटलेली बस नेहमीप्रमाणे महाडमध्ये नोकरी निमित्त येणारे कर्मचारी आणि शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी घेऊन गांधारपाले येथे आली.गेले काही दिवसांपासून खालच्या जुन्या रस्त्याने जाणारी गाडी ड्रायव्हरने आजच हायवे-वरून महाडच्या दिशेने दामटली इतक्यात एका अवघड वळणावर समोरून येणाऱ्या टाटा एजीसीएल बसला या एस.टी.ने समोरासमोर धडक दिली.हा अपघात एवढा भीषण होता की बसचा पुढील सर्व भाग चेपून गेला तर बस चा दरवाजा तुटून टाटा एजीसीएल च्या गाडीमध्ये अडकून बसला.
टाटा एजीसीएल ही गाडी गोव्याहून उरणच्या दिशेने चालली होती.या गाडीचे स्टेरिंग डाव्या बाजूस असल्याने गाडीचा चालक दिलीप शिरोडकर(विचोली,गोवा) हा थोडक्यात बचावला तर एस.टी.बस चा चालक सुरेंद्र बाबा पाटील(माणगाव) हा गंभीर जखमी झाला.ह्या धडकेची तीव्रता जास्त असल्याने पुढील सीट वर आदळून अठरा प्रवाशी जखमी झाले.यामध्ये सुवर्णा सुदाम निकम(केंबूर्ली) हिचे डोके काचेवर जोरात आदळल्याने काचा डोक्यात शिरून ती जागेवरच बेशुद्ध झाली.तिला महाड मधील ट्रामा केअर सेंटर मध्ये हलवण्यात आले.परंतु प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उचारासाठी तिला मुंबई येथील सायन रुग्णालयात हलवण्यात आले.
या अपघातात वाहक आकाश मनोहर खैरे(वय २२,श्रीवर्धन),श्वेता सुरेश निकम (वय १६,केंबूर्ली),रसिका अनिल खानविलकर (वय २१,गोरेगाव),हरिश्चंद्र अर्जुन भोनकर (वय ४५),राजू मनोहर महाडिक(३८, गांधारपाले),रविकांत दिनकर पिंगळे(४७, गांधारपाले),चंद्रकांत दिनकर पिंगळे (२३,गांधारपाले),कामिनी भागवत (२१,गोरेगाव ),नवीन जैन(१८,गोरेगाव),समीर बोधीलकर (१९,गोरेगाव),रुक्सार अब्दुलगणी डावरे(२३,गोरेगाव),स्वप्नाली हनुमंत अडसूळ (१७,गोरेगाव),तस्नीम यासीन संगे(२४,गोरेगाव) इ.जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच महाड आगारप्रमुख देवधर,वाहतूक नियंत्रक अंबुर्लेकर तातडीने घटनास्थळी पोचले.क्रेन ने एस.टी.बाजूला करून अर्धा तास ठप्प असणारा महामार्ग मोकळा केला गेला.जखमींना एस.टी.महामंडळाकडून तातडीने मदत जाहीर करण्यात आली.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वर्षासहल उमरठ येथे संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वर्षासहल उमरठ येथे संपन्न

पोलादपूर (नितीन कळंबे) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी वर्षासहलीचे आयोजन करण्यात येते.एखादे ऐतिहासिक स्थळ निवडून त्याठिकाणी व्याख्याने,विविध खेळ यांचे आयोजन केले जाते.

गेल्यावर्षी मुरुड येथील कोर्लई किल्ल्यावर वर्षासहलीचे आयोजन करण्यात आले होते,तर या वर्षी पोलादपूर तालुक्यातील उमरठ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी ही वर्षासहल संपन्न झाली.परवा (दि.२६)रोजी रायगड जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख कौस्तुभ सोहनी यांनी व्याख्यानाद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती स्वयंसेवकांना समजावून सांगितली.दि.२७ रोजी सकाळी मैदानात कबड्डी,कुस्ती सारखे मर्दानी खेळ खेळण्यात आले.यानंतर वर्षासहलीची सांगता पराग कंगले (बौद्धिक प्रमुख-कोकण प्रांत) यांच्या व्याख्याने झाली.व्याख्यानामध्ये त्यांनी आगामी काळातील भारतासमोरील आव्हाने यावर स्वयंसेवकांशी संवाद साधला.मा.चंद्रकांत कळंबे (जि.प.उपाध्यक्ष) यांनी उपस्थित स्वयंसेवकांना नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास समजावून सांगितला.याप्रसंगी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून १३० स्वयंसेवक उपस्थित होते.   

पोलादपुरचे सुपुत्र लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित “टपाल” चित्रपट लवकरच होणार प्रकाशित

पोलादपुरचे सुपुत्र लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित “टपाल” चित्रपट लवकरच होणार प्रकाशित

ब्लू,कौन बनेगा करोडपती,बॉस,इंग्लिश-विंग्लिश मध्ये 

सिनेमॅटोग्राफी लक्ष्मण उतेकर यांची

पोलादपूर(नितीन कळंबे) –मोबाईल,संगणक.सोशल मिडिया 

यांच्या जंजाळात पोस्टमन ही संकल्पना 

मागे पडताना दिसत आहे.मात्र खासकरून ग्रामीण जीवनात 

पोस्टमनच्या भावनिक वलय लाभलेल्या 

भूमिकेतून हृदयस्पर्शी,नात्यांची मार्मिक गुंफण असलेली कथा 

घेऊन टपाल हा चित्रपट २६ सप्टे.२०१४ 

रोजी प्रकाशित होत आहे. मैत्रेयी मास मिडिया यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाची कथा “टिंग्या 

फेम” मंगेश हाडवळे यांनी लिहिली असून वीणा जामकर,नंदू माधव,मिलिंद गुणाजी यांनी त्यात 

अभिनय केला आहे.

लक्ष्मण उतेकर हे पोलादपूर मधील मोरसडे या गावातील आहेत.”टपाल” या चित्रपटात प्रमुख भूमिका 


याच मोरसडे या गावातील दोन लहान मुलांनी केली आहे.या मुलांनी अभिनयाचे कुठलेही तांत्रिक 

शिक्षण घेतले नसतानाही लक्ष्मण उतेकर यांनी त्यांना संधी देऊन त्यांच्याकडून सशक्त अभिनय 

करवून घेतला आहे.यासाठी त्यांच्या अभिनयाच्या कार्यशाळेची जबाबदारी ही लक्ष्मण उतेकर यांनीच 

घेतली. स्वत: लक्ष्मण यांनीसुद्धा छायाचित्रणाचे कोणतेही तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले नाही.जयंत ब्रदर्स 

या स्टुडीओ मध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करत असताना कॅमेरा लोकेशन वर ने-आण करायची 

जबाबदारी त्यांची होती.त्यामुळे शुटींग संपेपर्यंत त्यांना लोकेशन वर थांबावे लागे,याच दरम्यान 

त्यांनी कॅमेरा हाताळणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आणि एकलव्याच्या भूमिकेतून त्यांनी १६ वर्षे 

मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर आज हिन्दी चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान मिळवले आहे.अमिताभ 

बच्चन यांच्या “कौन बनेगा करोडपती” च्या जाहिरातींचे चित्रण,”आयडिया” या कंपनीच्या 

जाहिरातीचे 

चित्रण तसेच अक्षय कुमार याच्या “ब्लू” आणि “बॉस” तसेच गौरी शिंदे यांच्या “इंग्लिश -विंग्लिश” 

इ.चित्रपटांचे छायाचित्रण लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.


चित्रपट रिलीज होण्याअगोदरच राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर याला भरभरून प्रतिसाद 

मिळाला.जानेवारी मध्ये पार पडलेल्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल आणि १२व्या पुणे 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला. पुणे इंटरनॅशनल फिल्म 

फेस्टीव्हलमध्ये मध्येसुद्धा या चित्रपटाला भरभरून पप्रोत्साहन मिळाले.इंडियन इंटरनेशनल फिल्म 

फेस्टिवल ऑफ साउथ आफ्रिका या पुरस्कार सोहळ्यात वीणा जामकर यांनी टपाल चित्रपटातील 

भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म 

फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  टपाल या 

चित्रपटाची निवड झाली आहे.  दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या भारतीय चित्रपट महोत्सवातही "टपाल" ची 

निवड झाली आहे. सिडनी, फ्रान्समधील वेसोल, अमेरिकेतील लॉस एंजिल्स, इटली, जर्मनी, चीन या 

देशांमधूनही "टपाल" ला निमंत्रण मिळाले आहे.



तालुक्यातील सुपुत्राने जगाच्या नकाशावर इतके दैदिप्यमान यश मिळवून सुद्धा स्थानिक प्रशासन 

याबाबतीत उदासीन दिसते.तालुक्यातर्फे त्यांचे कोणत्याही प्रकारचे कौतुक केले जात नाही.आमसभेत 

त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही कधी घेतला गेला 

नाही.त्यांच्या या यशाबद्दल सुद्धा अगदी 

मोजक्याच 


लोकांना माहित आहे.लोकप्रतिनिधींच्या निव्वळ 

“राजकारण एके राजकारण“ या भूमिकेमुळे 

अयोध्या 

असूनही लक्ष्मण वनवासीच असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. 

Sunday, July 27, 2014

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वर्षासहल उमरठ येथे संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वर्षासहल उमरठ येथे संपन्न

पोलादपूर (नितीन कळंबे) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी वर्षासहलीचे आयोजन करण्यात येते.एखादे ऐतिहासिक स्थळ निवडून त्याठिकाणी व्याख्याने,विविध खेळ यांचे आयोजन केले जाते.

गेल्यावर्षी मुरुड येथील कोर्लई किल्ल्यावर वर्षासहलीचे आयोजन करण्यात आले होते,तर या वर्षी पोलादपूर तालुक्यातील उमरठ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी ही वर्षासहल संपन्न झाली.परवा (दि.२६)रोजी रायगड जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख कौस्तुभ सोहनी यांनी व्याख्यानाद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती स्वयंसेवकांना समजावून सांगितली.दि.२७ रोजी सकाळी मैदानात कबड्डी,कुस्ती सारखे मर्दानी खेळ खेळण्यात आले.यानंतर वर्षासहलीची सांगता पराग कंगले (बौद्धिक प्रमुख-कोकण प्रांत) यांच्या व्याख्याने झाली.व्याख्यानामध्ये त्यांनी आगामी काळातील भारतासमोरील आव्हाने यावर स्वयंसेवकांशी संवाद साधला.मा.चंद्रकांत कळंबे (जि.प.उपाध्यक्ष) यांनी उपस्थित स्वयंसेवकांना नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास समजावून सांगितला.याप्रसंगी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून १३० स्वयंसेवक उपस्थित होते.   

Saturday, July 19, 2014

महाडमध्ये एस.टी.बस –टाटा लक्झरीची समोरासमोर टक्कर

महाडमध्ये एस.टी.बस –टाटा लक्झरीची समोरासमोर टक्कर
१९ प्रवासी जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक

पोलादपूर(नितीन कळंबे) – गोरेगाव स्थानकातून सकाळी आठ वाजता सुटलेली बस नेहमीप्रमाणे महाडमध्ये नोकरी निमित्त येणारे कर्मचारी आणि शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी घेऊन गांधारपाले येथे आली.गेले काही दिवसांपासून खालच्या जुन्या रस्त्याने जाणारी गाडी ड्रायव्हरने आजच हायवे-वरून महाडच्या दिशेने दामटली इतक्यात एका अवघड वळणावर समोरून येणाऱ्या टाटा एजीसीएल बसला या एस.टी.ने समोरासमोर धडक दिली.हा अपघात एवढा भीषण होता की बसचा पुढील सर्व भाग चेपून गेला तर बस चा दरवाजा तुटून टाटा एजीसीएल च्या गाडीमध्ये अडकून बसला.
टाटा एजीसीएल ही गाडी गोव्याहून उरणच्या दिशेने चालली होती.या गाडीचे स्टेरिंग डाव्या बाजूस असल्याने गाडीचा चालक दिलीप शिरोडकर(विचोली,गोवा) हा थोडक्यात बचावला तर एस.टी.बस चा चालक सुरेंद्र बाबा पाटील(माणगाव) हा गंभीर जखमी झाला.ह्या धडकेची तीव्रता जास्त असल्याने पुढील सीट वर आदळून अठरा प्रवाशी जखमी झाले.यामध्ये सुवर्णा सुदाम निकम(केंबूर्ली) हिचे डोके काचेवर जोरात आदळल्याने काचा डोक्यात शिरून ती जागेवरच बेशुद्ध झाली.तिला महाड मधील ट्रामा केअर सेंटर मध्ये हलवण्यात आले.परंतु प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उचारासाठी तिला मुंबई येथील सायन रुग्णालयात हलवण्यात आले.
या अपघातात वाहक आकाश मनोहर खैरे(वय २२,श्रीवर्धन),श्वेता सुरेश निकम (वय १६,केंबूर्ली),रसिका अनिल खानविलकर (वय २१,गोरेगाव),हरिश्चंद्र अर्जुन भोनकर (वय ४५),राजू मनोहर महाडिक(३८, गांधारपाले),रविकांत दिनकर पिंगळे(४७, गांधारपाले),चंद्रकांत दिनकर पिंगळे (२३,गांधारपाले),कामिनी भागवत (२१,गोरेगाव ),नवीन जैन(१८,गोरेगाव),समीर बोधीलकर (१९,गोरेगाव),रुक्सार अब्दुलगणी डावरे(२३,गोरेगाव),स्वप्नाली हनुमंत अडसूळ (१७,गोरेगाव),तस्नीम यासीन संगे(२४,गोरेगाव) इ.जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच महाड आगारप्रमुख देवधर,वाहतूक नियंत्रक अंबुर्लेकर तातडीने घटनास्थळी पोचले.क्रेन ने एस.टी.बाजूला करून अर्धा तास ठप्प असणारा महामार्ग मोकळा केला गेला.जखमींना एस.टी.महामंडळाकडून तातडीने मदत जाहीर करण्यात आली.



खोपड येथील मोरझोतावर पर्यटकांची तुफान गर्दी

खोपड येथील मोरझोतावर पर्यटकांची तुफान गर्दी

पोलादपूर(नितीन कळंबे) –पूर्ण पोलादपुर तालुक्यातून वर्षासहल जर काढायची असेल तर मोरझोत धबधब्याला भेट दिल्याशिवाय तुमची सहल सुफळ,संपूर्ण निश्चितच होणार नाही.सह्याद्रीच्या कुशीतून धाव घेऊन उंचावरून जमिनीवर बेफामपणे आदळणारे जलप्रपात पोलादपूरमध्ये काही कमी नाहीत परंतु या सगळ्यांमध्ये स्वत:चे वेगळे अस्तित्व राखून असलेला खोपड-चांदके गावांच्या सीमेवरील फेसाळता मोरझोत धबधबा कित्येक वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
पोलादपूरपासून सुमारे बावीस किलोमीटरवर असलेला मोरझोत हा पर्यटकांचा “ऑल-टाईम फेवरेट” धबधबा आहे.तब्बल एक महिना हुलकावणी दिलेल्या पावसाने पर्यटकांच्या उत्साहावर जवळ-जवळ पाणी फिरवल्याचे दिसून येत होते.मुंबई-पुण्यातून खास मोरझोतवर येणाऱ्या चाकरमाने पर्यटक गावाकडे फोन करून सातत्याने “मोरझोताला पाणी आले कि नाही ?” अशी चौकशी करत होते.फेसबुकवर गेल्यावर्षीचे मोरझोतचे फोटो अपलोड होत होते.चांदके येथील आदिवासी बांधवांना या निमित्ताने जी रोजगाराची संधी निर्माण होते ती संधी देखील निसर्गाने हिरवल्याचीच चिन्हे दिसून येत होती.

गेला आठवडाभर सुरु असलेल्या संततधार पावसाने मोरझोत बेफामपणे पर्वताराजींवरून उद्या घेत खाली कोसळू लागला.चाकरमाने सुट्ट्या कधी मिळतात याची संधी पाहू लागले,काहींनी त्यांचे वीकेंड खास मोरझोत साठी राखून ठेवले,कॉलेज मधील मुले-मुली सुट्ट्यांच्या दिवसात तर कधी सरळ कॉलेजला दांडी मारून मोरझोत वर मौजमजा करताना दिसून येऊ लागली.काही हौशी तरुण पुण्या-मुंबईहून वाद्य,डी.जे.,बाजा,स्पीकर घेऊन येतात आणि बेभानपणे नृत्य करताना दिसून येतात.

हा धबधबा इतर धबधब्यांपेक्षा सुरक्षित मानला जातो.येथील पाण्याला अजिबात खोली नाही.तसेच डोंगरावरून दोन टप्प्यांतकोसळल्याने पाण्याचा प्रवाह तितकासा जोरदार नसतो याचा फायदा घेऊन काही अति-उत्साही पर्यटक थेट धबधब्याखाली उभे राहून वेगाने खाली येणारे पाणी अंगावर घेणे पसंत करतात.दगडांची संख्या जास्त असल्याने पाय जपून टाकले नाहीत तर घसरण्याचा संभव असतो तसेच काही बेजबाबदार मद्यपींनी दारूच्या बाटल्या फोडल्याने काचांपासून सांभाळावे लागते.

निसर्गाने सौंदर्याच दान पोलादपूरच्या पदरात भरभरून दिलं आहे याची प्रचीती येते.कड्यावरून कोसळून मध्येच उसळी घेणारा फेसाळता धबधबा मंद मंद वाहणारी हवा ओलीचिंब करून टाकतो,समोरील रस्त्यावर उभे राहिल्यास स्पर्श करणारे तुषार अंगावर शहारे आणतात.काही पर्यटक धबधब्याच्या आतील अंगाला असलेल्या गुहेतून समोर कोसळणाऱ्या धबधब्याचे फोटो काढण्याचे धाडस करतात.या पावसाळ्यात सर्वांनी जरूर या धबधब्याचा आनंद घ्यावा आणि आपल्या वर्तवणुकीने इतरांच्या आनंदाला बाधा येणार नाही,निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.   

Wednesday, July 16, 2014

सद्गुरू दादामहाराज मोरे माऊली यांचा गुरुपोर्णिमा सोहळा उद्या

सद्गुरू दादामहाराज मोरे माऊली यांचा गुरुपोर्णिमा सोहळा उद्या

 
पोलादपूर(नितीन कळंबे)-महाराष्ट्र वारकरी महामंडळ मुंबई शाखेचे अध्यक्ष वै.ह.भ.प.ज्ञानेश्वर मोरे माऊली यांचा अध्यात्मिक वारसा समर्थपणे पेलून वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रभर प्रचार व प्रसार करणारे त्यांचे सुपुत्र ह.भ.प.दादामहाराज मोरे माऊली यांच्या गुरुपोर्णिमेचा कार्यक्रम उद्या (दि.१७) रोजी पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे हॉल मध्ये संपन्न होईल.


सद्गुरू मोरे माऊली वारकरी सेवा समिती(कोकण विभाग) यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता गुरुपरंपरेच्या अभंगांवर होणाऱ्या सांप्रदायिक भजनाने सुरु होईल.११ वाजता ह.भ.प.ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या प्रतिमेचे अनावरण जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते होईल यानंतर सद्गुरू दादामहाराज मोरे यांच्या प्रवचनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.दुपारी एक ते दोन या वेळात सद्गुरू दर्शन सोहळ्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी सर्वांनी गुरुपुजनाच्या सोहळ्यास उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सद्गुरू मोरे माऊली वारकरी सेवा समिती(कोकण विभाग) यांच्या मार्फत करण्यात आले आहे. 

Monday, July 14, 2014

Article by Nitin kalambe


News of virtual dindi by Swapnil More



Accident in Poladpur news by Nitin kalambe published in Raigad Times (14-7-2014)


Tuesday, July 8, 2014

सूर्याजी मालुसरे समाधीस्थळ ...साखर ता.पोलादपूर,जि.रायगड


खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता

खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता 


पोलादपूर(नितीन कळंबे )- पोलादपूर येथील प्रभातनगर मध्ये हॉटेल गोल्डन पेलेस च्या बाजूने सहानेकडे जाणारा कच्चा रस्ता एका खड्यामुळे धोकादायक बनला आहे.सदर खड्डा हा आकाराने जरी मोठा नसला तरीसुद्धा येथील लहान विद्यार्थ्यांची ये-जा बघता हा चिंतेच्या विषय ठरत आहे.

हा खड्डा गटावरील स्लब तुटल्यामुळे तयार झाला आहे.आकाराने इतका मोठा नसला तरी आतमध्ये पाय पडल्यास सळईमध्ये अडकून पाय मोडण्याची भीती आहे .इथून केवळ दहा पाऊले अंतरावर सिद्धगिरी संस्थेची यशवंतराव इंग्लिश मेडियम ही शाळा आहे.त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मुले येथून ये-जा करतात.तसेच प्रभातनगर,हनुमान नगर,भैरवनाथ नगर सिद्धार्थनगर येथील मुले जनसेवा प्रतिष्ठान,तालुका शाळेत जाताना मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर हाच रस्ता वापरतात तसेच नागरिक बाजारपेठेत जाताना सर्रासपणे याच रस्त्याचा वापर करतात.

रामजानकी अपार्टमेंट तसेच शगुन अपार्टमेंट मधील मुले येथे खेळताना दिसून येतात त्यामुळे कोणती अनुचित घटना घडण्याआधी ग्रामपंचायतीने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

पोलादपूर तालुका वाचनालय वाचकांच्या प्रतीक्षेत

पोलादपूर तालुका वाचनालय वाचकांच्या प्रतीक्षेत 


पोलादपूर(नितीन कळंबे) - "ग्रंथ हेच मानवाचे मित्र" असं म्हटलं जातं.पुस्तके ही मानवी जीवन समृद्ध करण्यास मदत करतात.वाचनामुळे ज्ञानात वाढ होते,भाषा समृद्ध होते,वाचनामुळे अनेक व्यक्तींच्या आयुष्यात महत्वपूर्ण बदल घडून आले आहेत तसेच कित्येक लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला आहे परंतु आजकाल सोशल मिडियाच्या माऱ्यापुढे वाचनसंस्कृती कमी झाल्याचे दिसून येत आहे.

पोलादपूर येथील तालुका वाचनालय १९७० मध्ये स्थापन झाले.ग्रंथालय संचालनालय-महाराष्ट्र राज्य,मुंबई अंतर्गत असणारे हे वाचनालय विविध विषयांवर असलेल्या पुस्तकांनी समृद्ध आहे.यामध्ये धार्मिक ग्रंथ,माहितीपर पुस्तके,ऐतिहासिक पुस्तके,काव्य आणि नाट्यविषयक पुस्तके,स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारी पुस्तके,विविध विषयांवरील कादंबऱ्या,चरित्रे,आत्मचरित्रे,माहितीकोश,बालसाहित्य,कथासंग्रह,शासकीय योजनांची माहिती देणारी पुस्तके,प्रत्येक व्यावसायिक क्षेत्राशी निगडीत असणारी पुस्तके,व्यक्तिचित्रणे,कला तसेच संगीताशी निगडीत पुस्तके,व्यावहारिक पुस्तके,पाककला,संगणक ज्ञान, अशा प्रकारच्या एकूण चौदा हजार पुस्तकांचा समावेश होतो.ही पुस्तके प्रामुख्याने मराठी तसेच हिंदी,इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत.

लोकमत,सकाळ,लोकसत्ता सह सोळा दैनिक वृत्तपत्र,सोळा साप्ताहिके, सोळा मासिके तसेच दिवाळी अंक येथे वाचावयास मिळतात.वृत्तपत्रांचे वाचन करण्यासाठी येथे स्वतंत्र वृत्तपत्र कक्ष आहे.

येथील सभासदत्वासाठी एका महिन्याचे केवळ दहा रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाते.सर्व पुस्तकांचे वर्गीकरण केल्यामुळे पुस्तके शोधणे सोपे जाते.सावित्री नदीची खळखळ ऐकत येथे बसून पुस्तक वाचण्याची मजा काही औरच..! सकाळी साडेआठ ते दहा तर संध्याकाळी साडेचार ते सात या वेळात वाचनालय चालू असते तर सोमवार हा सुट्टीचा दिवस असतो.काही अडचण आल्यास येथील ग्रंथपाल निकिता शेठ,लिपिक महाडिक तसेच शिपाई कीर्ती नगरकर मदत करण्यास सदैव तत्पर असतात.

वाचनाची सवय ही बालकांना लहानपणापासून लावणे अतिशय गरजेचे आहे.लहानपणी लावलेली सवय ही टिकून राहून मुले मोठेपणी अधिकाधिक वाचनासाठी प्रवृत्त होतात असे संशोधनातून आढळून आले आहे.लहानपणी गोष्टीची पुस्तके वाचण्याची सवय लावलेल्या मुलांमध्ये जवळजवळ नव्वद टक्के मुलांमध्ये नंतर मोठेपणी वाचनाची आवड स्वयंप्रेरणेने निर्माण होते.त्यामुळे भावी पिढी सुसंस्कृत करण्यासाठी वाचनसंस्कृती जपणे गरजेचे आहे.लहानपणीच वाचनप्रक्रियेतील आनंदाची ओळख झाली नाही,वाचनाची आवड रुजली नाही तर मात्र एका सुंदर अनुभूतीला ही मुले कायमची मुकतील.

मोबाईल वाचनालये,इंटरनेट वरील ऑनलाईन वाचनालये,गाडीवरील फिरती वाचनालये,ई-बुक्स इ.येनकेन प्रकारे समाजाला वाचनाची सवय लावण्यासाठी झटत असतात मात्र एवढे सुसज्ज वाचनालय असून सुद्धा त्याकडे पोलादपूरकरांनी साफ दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.चौऱ्याहत्तर टक्के सुशिक्षित असलेल्या या तालुक्यात अर्धा टक्काही वाचक नाहीत यापेक्षा दुर्दैव आणखी काय असू शकेल ?

सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्याच आरोग्याशी खेळ

सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्याच आरोग्याशी खेळ


महाड/नितीन कळंबे (दि.२) - महाड नगरपरिषदेतील आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांना गमबूट,हातमोजे इत्यादी साहित्य आरोग्यविषयक सुरक्षेसाठी दिलेले असतानाही सफाई-कर्मचारी मात्र त्याचा उपयोग करताना दिसून येत नाहीत त्यामुळे अनेक दुर्धर आजारांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सफाई करताना अनेक प्रकारच्या घटक जीवजंतुंशी कामगारांचा संपर्क येतो.सडलेले अन्न,कुजलेल्या भाज्या,जनावरांचे मलमूत्र,प्लास्टिक इत्यादी अनेक पदार्थ उचलताना सफाई कामगारांनी हातमोजे घालणे ही अत्यावश्यक बाब आहे तसेच तोंडावाटे जंतूंचे होणारे मार्गक्रमण रोखण्यासाठी नाक आणि तोंड  स्कार्फने झाकणे आवश्यक आहे.नाली-गटारांची सफाई करताना पायात कोणती वस्तू लागून जखमा होऊ नयेत म्हणून त्यांना गमबूट पुरवले जातात मात्र वरील साधने उपलब्ध असूनही महाड मधील सफाई कर्मचारी याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.याबाबत एका सफाई कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता गमबूट आणि हातमोजे घालणे ही त्याच्या दृष्टीने महत्वाची बाब नसल्याचे त्याने सांगितले त्यामुळे पुरवण्यात आलेल्या साहित्याबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक समुपदेशन करणे महत्वाचे बनले आहे.




अचानक आलेल्या पावसाने महाडकरांची उडवली तारांबळ

अचानक आलेल्या पावसाने महाडकरांची उडवली तारांबळ

पोलादपूर\नितीन कळंबे-"ये रे ये रे पावसाचा" राग आळवत असताना आज पाउस खरच आला.सुमारे दहा मिनिटे कोसळलेल्या या धो-धो पावसाने महाडकरांची चांगलीच तारांबळ उडवली.

पावसाची आतुरतेने वाट पाहणारा बळीराजा या पावसाने अल्पकाळ हा होईना सुखावला.राब कोमेजून जाण्याच्या तसेच पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा पाउस आशेचा किरण दाखवणारा ठरला.मात्र अचानक आलेल्या या पावसाने छत्री न घेता बाहेर पडलेल्या बेसावध नागरीकांना चांगलेच भिजवून टाकले.

रस्त्यावरील फळविक्रेत्यांनी पावसाला थोपवून धरण्यासाठी मोठ्या छत्र्या,मेणकापड,मोठे प्लास्टिक यांची तजवीज केली होती.मात्र रस्त्याच्या दुतर्फा रानभाजी,रानमेवा विकण्यास बसलेल्या आदिवासी स्त्रिया मात्र टोपल्या तिथेच टाकून आडोसा शोधण्यासाठी एकच धावपळ करताना दिसत होत्या.विद्यार्थी दप्तरातील वह्या-पुस्तके भिजू नयेत म्हणून दुकानांच्या छताखाली गर्दी करत होते. मात्र दहा मिनिटातच हा पाउस थांबला आणि लगेचच नेहमीसारखे कडक ऊन पडले.

तरुण अडकले तीन पत्तीच्या विळख्यात

तरुण अडकले तीन पत्तीच्या विळख्यात

तीन पत्ती : ऑनलाईन जुगाराचे नवीन नाव

पोलादपूर/नितीन कळंबे - सोशल नेटवर्किंग साईट्स वरील कॉन्टॅक्टस वापरून "तीन पत्ती" हा गेम खेळणाऱ्या तरुणांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते आहे.हा गेम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून चक्क  ऑनलाईन खेळला जाणारा जुगारच आहे. खेळण्यास अतिशय सोपा असलेला हा गेम तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे.हा गेम भारतात खेळल्या जाणाऱ्या तिर्रट या पत्त्यांच्या खेळासारखा सारखा आहे.

अँड्रॉईडबेस असलेल्या मोबाईल फोन वर गुगल प्ले स्टोअर वरून तीन पत्ती फुकटात डाऊनलोड करता येतो,लगेचच तुम्हाला हाच गेम खेळणाऱ्या इतर व्यक्तींची नावे दिसतात किंवा सोशल नेट्वर्किंग साईट्स वरील  कॉन्टॅक्टस किंवा ई-मेल कॉन्टॅक्टस वापरून आपण आपल्याला हव्या त्या व्यक्तींशी देखील हा जुगार खेळू शकतो.एकदा युझर्स लॉगइन झाले,की सुरु होतो आभासी पैशांचा खेळ..खेळणारा अधिकाधिक गुंतत जातो त्याला वेळेचे भान उरत नाही.ज्याच्याकडे जास्त  कॉईन्स त्याला मोठा टेबल आणि ज्याच्याकडे नाही तो गेम च्या बाहेर.मात्र यामध्ये धक्कादायक बाब अशी आहे कि काही तरुण खरे पैसे देऊन आभासी म्हणजे व्हर्च्युअल  पैसे विकत घेतात त्यामुळे पैसे लावून जुगार खेळण्याचे स्वरूप तीन पत्तीला प्राप्त झाले आहे.याच मार्गाचा वापर करून गुजरात मधील तरुणांनी ५० कोटी रुपये कमावल्याचे उघडकीस आले आहे.

संध्याकाळी महाड मध्ये फेरफटका मारला तर तुम्हाला जिन्याच्या पायऱ्यांवर ओळीने तीन पत्ती खेळत बसलेले तरुण आढळतील.याचप्रमाणे शाळा,कॉलेज,क्लासेस,उद्याने यांमध्येही अनेक मुले-तरुण तीन पत्ती खेळत असल्याचे दिसून येते.हा ऑनलाईन गेम असल्याने या जुगऱ्यावर पोलीस कारवाई करू शकत नाहीत त्यामुळे हा जुगार खेळणार्यांचे चांगलेच फावले आहे.मात्र याप्रकारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे तीन पत्ती पालकांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे.तसेच अधिकाधिक वेळ या खेळात गुंतून राहिल्याने पारंपारिक मैदानी खेळांकडे तरुणांचे दुर्लक्ष होऊन आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या आहेत.तीन पत्ती अधिक वेळ खेळल्याने डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम ही गंभीर बाब असल्याचे डॉक्टर सांगतात .त्यामुळे वेळीच या जुगाराला आवर न घातल्यास हा केवळ गेम न राहता सामाजिक आरोग्य बिघडवणारा व्हायरस ठरण्याची चिंता तज्ञांनी व्यक्त केली आहे.  

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिली पोलादपूरला भेट

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिली पोलादपूरला भेट 


पोलादपूर\नितीन कळंबे - केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी (दि.२२) रोजी पोलादपुरला भेट दिली.यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

रात्री साडेनऊ च्या सुमारास ना.गीते यांचे आगमन झाले तेव्हा तालुक्यातील शिवसैनिकांनी प्रचंड संख्येने उत्साहात त्यांचे फटाक्यांच्या अतिषबाजीत आणि वाद्यांच्या सुरात जंगी स्वागत केले. यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी शाल,श्रीफळ देऊन गीते यांचा सत्कार केला.

यावेळी पोलादपूर तालुक्यातील मतदानाने खासदारकीच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली यासाठी ना.गीते यांनी तालुक्यातील जनतेचे आभार मानले.याप्रसंगी

ओंबळीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केली रस्त्याची डागडुजी


ओंबळीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केली रस्त्याची डागडुजी 


पोलादपूर\नितीन कळंबे(दि.२८) - प्रशासनाकडून कोणत्याही मदतीची वाट बघत बसण्यापेक्षा ओंबळीच्या ग्रामस्थांनी,शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी तब्बल सहा ते सात तास  श्रमदानातून खेड-ओंबळी रस्त्याची डागडुजी केली.प्रशासनाच्या मदतीची नुसती वाट बघून स्वत: काहीच क्रियाशीलता न दाखवणाऱ्या लोकांना या विद्यार्थ्यांनी आदर्श घालून दिला आहे.

ओंबळी हे गाव पोलादपूरपासून १७ किलोमीटर अंतरावर आहे.हे तंटामुक्त गाव असून रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर येते.येथील श्रीसंत पोपट महाराज ताजणे या विद्यालयात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील  दहिवली व घोगरा या गावांतील ६० ते ७० मुले शिकतात.ही गावे ओंबळीपासून सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर असल्याने त्यांना शाळेत येण्यासाठी  एस.टी.बस हे अत्यंत महत्वाचे माध्यम होते.मात्र ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात  खड्डे असल्याने आणि ठीकठिकाणी मोऱ्या तुटलेल्या असल्याने ही बस बंद करण्याचा प्रस्ताव खेड आगारात विचाराधीन होता.त्यामुळे दिवसातून सकाळी साडे दहा वाजता आणि संध्याकाळी साडेचार वाजता येणाऱ्या दोन बस बंद होऊन शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची भीती निर्माण झाली.

ओंबळी ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी श्रमदानातून रस्त्याची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला.सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तीन किलोमीटर पर्यंत ह्या रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले.यामध्ये युवा कीर्तनकार आणि ओंबळी गावचे सरपंच रवींद्र महाराज सकपाळ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोपाळ चिकणे आणि इतर ग्रामस्थ,श्रीसंत पोपट महाराज ताजणे विद्यालयातील मुख्याध्यापक पाटीलसर ,दीपक सकपाळ सर,संदीप सकपाळ,मदाले सर,वितमल सर, तसेच शिपाई दिलीप बुवा चिकणे आणि बाबू ढेबे,विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनिंचा उत्साही सहभाग होता.

अशाप्रकारे केलेल्या कामानंतर येणाऱ्या एस.टी. चालकांकडे त्यांनी रस्त्याविषयी विचारणा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.एस.टी.आणण्यास आता कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.याविषयी खेड आगाराप्रमुख श्री.निकम आणि श्री.जंगम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सदर रस्ता सुधारला असेल तर बससेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आम्हाला कोणतीही अडचण नाही असे सांगितले.श्रमदानाला मिळालेल्या या यशामुळे ओंबळीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक तालुक्यातील सर्व स्तरांतून होत आहे.


पोलादपूर ते दाभीळ वस्तीची एस.टी. सेवा सुरु


पोलादपूर ते दाभीळ वस्तीची एस.टी. सेवा सुरु 


पोलादपूर\नितीन कळंबे(दि.२५) - राज्य परिवहन महामंडळाची पोलादपूर ते दाभीळ वस्तीची बससेवा आज (दि.२५) रोजी सुरु करण्यात आली.बसची वेळ संध्याकाळी सहाची निश्चित करण्यात आली आहे.या बस-सेवेचे उद्घाटन नारळ वाढवून जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलादपूर पासून साधारण १५ किलोमीटर अंतर असणाऱ्या या गावांत वस्तीची एस.टी.नव्हती त्यामुळे संध्याकाळी दाभीळ गावी जाण्यासाठी लहुळसे एस.टी. पकडून तिथून १ किलोमीटर दाभीळ मध्ये चालत जावे लागे तसेच पोलादपूर ठिकाणी कॉलेज शिकणारे विद्यार्थी आणि देवळे गावी हाय-स्कूल मधील विद्यार्थी यांच्या वेळेचा नाहक अपव्यय होऊन त्यांची गैरसोय होत होती.त्यामुळेच ही बस सेवा प्रामुख्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबावी यासाठीच सुरु करण्यात आल्याचे प्रताप कुमठेकर यांनी छोटेखानी भाषणामध्ये सांगितले.याप्रसंगी शिवसेनेचे देवळे गावचे सरपंच प्रकाश कदम ,निलेश आहिरे,लक्ष्मण मोरे,गुणाजी दळवी ग्रा.पं.सदस्य दाभीळ,गणेश कळंबे तसेच आगारप्रमुख आबा दरेकर आणि महाड आगाराचे शिवाजी जाधव हे उपस्थित होते.ही एस.टी. सुरु झाल्याने दाभीळच्या गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Monday, July 7, 2014

पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त

पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त 

दुबार पेरणीचे संकट 

पोलादपूर\नितीन कळंबे - यावर्षी पावसाने दरवर्षीपेक्षा काहीशी  उशिरा हजेरी लावली.जून महिन्याच्या मध्यात पावसाची चिन्हे दिसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र दोन-तीन दिवस चांगलाच बरसलेला पाऊस गेले सात-आठ दिवस दडी मारून बसला आहे.पावसाच्या अशा लपाछपीच्या खेळाणे बळीराजा मात्र चिंतातूर झाला आहे.

आवण चांगले उभारून आले असताना पाऊसच गायब झाल्याने रोपे करपून जाण्याच्या मार्गावर आहेत.ज्या शेतकऱ्यांनी शेतात खतांची पेरणी केली आहे त्यांचाही खर्च वाया गेला आहे.बियाणे आणि महागडी खते अशी वाया जाताना पाहून चिंतातूर बळीराजा आकाशाकडे डोळे लाऊन बसला आहे.पावसाची चिन्हे तर नाहीतच आणि पडणारे कडक ऊन पाहून जिल्ह्यातील शेतकरी निराश झाला आहे त्यामुळे दुबार पेरणी करावी लागण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे.बैलाचे औत यंदा पाचशे ते आठशे रुपये,तसेच मजुरी ३०० ते पाचशे रुपये झाल्याने वाढत्या खर्चाचा प्रश्न सोडवीत असतानाच पावसाने घेतलेल्या परीक्षेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

रायगड जिल्ह्यात १ ते २३ जूनपर्यंत पडलेला सरासरी पाउस १५०.२९ मिमी. इतका आहे.२३ जून रोजी पोलादपूर मध्ये पडलेल्या शेवटच्या पावसाची नोंद २.०० मिमी.इतकी आहे.मृग नक्षत्र चालू होऊन पंधरवडा उलटला,आषाढ सुरु झाला आहे मात्र पावसाविषयी वेधशाळेसकट सगळीकडे संभ्रमावस्था दिसून येत आहे.

कोकणचा रानमेवा विकणाऱ्यांना आले "अच्छे दिन"

कोकणचा रानमेवा विकणाऱ्यांना आले "अच्छे दिन"
प्रामुख्याने आदिवासी समाजाला फायदा


पोलादपूर\नितीन कळंबे - यंदाचा लांबलेला पाउस आंबे,फणस इ .रानमेवा विकणाऱ्यांच्या चांगलाच पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे.पोलादपूर व महाड बाजारपेठमधील रोड दुतर्फा आंबे,फणस,आळू,करवंदे विक्रेत्यांनी फुलून जातात.यामध्ये प्रामुख्याने आदिवासी विक्रेते मोठ्या संख्येने आढळतात.

जर लवकर पाउस झाला तर आंबा,फणस अशा फळांमध्ये पाणी शिरून ती फळे खाण्यालायक राहत नाहीत.मात्र यावर्षी पाउस लांबल्याने ही फळे अजून चांगल्या स्थितीत आहेत त्यामुळे पर्यायाने विक्रीचे दिवसही वाढले आहेत.यामध्ये कच्चे तसेच पिक्के आंबे,कापे आणि बरके फणस,करवंदे,आळू,कोकम या फळांची विक्री होते.आंबे २० ते १०० रुपये डझन,तोतापुरी हापूस ४० रुपये किलो,आळू १० रुपये वाटा फणस ३० ते १५० रुपये इत्यादी दराने विक्री चालू असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

महाड मधील आय.आय.टी.कॉलेज चे संदीप राठोड यांचे सेट(SET)परीक्षेमध्ये सुयश

महाड मधील आय.आय.टी.कॉलेज चे संदीप राठोड यांचे सेट(SET)परीक्षेमध्ये सुयश

पोलादपूर/नितीन कळंबे- महाड मधील हिरवळ प्रतिष्ठान संचालित कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फोर्मेशन टेक्नोलोजी येथे कार्यरत असणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक संदीप राठोड यांनी सेट परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली.त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

याप्रसंगी झालेल्या सत्कार सोहळ्यात त्यांनी अथक परिश्रम आणि जिद्द्द हमखास यश मिळवून देईल असा कानमंत्र उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

अन दगडचं देव होऊन मदतीला धावला ...!

अन दगडचं देव होऊन मदतीला धावला ...!

अपघातात थोडक्यात टळले जीवावरचे संकट  


पोलादपूर/नितीन कळंबे - देव दगडात नाही देव माणसात आहे असे गाडगेबाबांनी सांगितले खरे पण देव दगडाच्या रूपातून सुद्धा मदतीला धाऊ शकतो याचे प्रत्यंतर शनिवारी (दि.२८) रोजी महाळुंगे ग्रामस्थांना आले.दगडाला ठोकर बसल्याने गाडी सुमारे ७० फुट दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,शनिवारी सकाळी राजेंद्र चव्हाण(वय २५) हा आपली महिंद्र बोलेरो गाडी(MH-०६ AN८६ ) घेऊन सकाळी सव्वा आठ वाजता महाळुंगे या गावापासून कापड्याकडे निघाला होता.गाडीमध्ये सुधाकर चव्हाण व त्यांची पत्नी तसेच लक्ष्मण चव्हाण हे साठ वर्षीय गृहस्थ होते.महाळुंगे गावापासून १ किलोमीटर प्रवास झाल्यावर गाडीचे ब्रेक फेल असल्याचे चालक राजेंद्रच्या लक्षात आले मात्र प्रसंगावधान राखून त्याने दुसऱ्या बाजूला गाडी जोरात वळवली मात्र दुसऱ्या बाजूला गाडी खड्ड्यात आदळून उलट्या दिशेला म्हणजे दरीच्या दिशेला वळली इतक्यात त्या सत्तर फुट दरीच्या वरच्या बाजूला असणाऱ्या मोठ्या दगडाला गाडी जोरात धडकली,पुढील उजव्या बाजूच्या टायरखाली तो दगड घुसून गाडीच्या खालचा भाग तुटला आणि मातीत रुतून बसला आणि गाडी जागीच थांबली.समोर आ वासून बसलेली प्रचंड खोल दरी आणि गाडीत पूर्णत: निशब्द वातावरण आणि धडधडती हृदये.एका क्षणात मृत्यूला चकवा देणाऱ्या माणसांची झालेली अवस्था हि शब्दांत मांडणे कठीण आहे.

मात्र यादरम्यान गाडीचा दरवाजा उघडला जाऊन लक्ष्मण चव्हाण हे साठ वर्षीय गृहस्थ बाहेर फेकले गेले यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.त्यांना तत्काळ इस्पितळात नेण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे डॉक्टरनी सांगितले.

शिक्षक समितीचे धरणे आंदोलन

शिक्षक समितीचे धरणे आंदोलन 

पोलादपूर\नितीन कळंबे (दि.२७)- शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती रायगड शाखेच्या वतीने दि.५ जुलै रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

शिक्षक समितीच्या वतीने याअगोदर शिक्षक व शिक्षणाच्या प्रश्नाकरता अनेक वेळा मा.मुख्यमंत्री,ग्रामविकास मंत्री,शिक्षणमंत्री यांची वारंवार भेट घेऊन चर्चा करून निवेदने दिली आहेत तरीसुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.यामध्ये संगणक परीक्षा मुदतवाढ मिळावी,२० पटाच्या आतील शाळा बंद करू नयेत,शालार्थ वेतन प्रणालीत सुधारणा व्हावी,उत्कृष्ट कामाच्या राज्य,राष्ट्रीय पुरस्काराच्या वेतनवाढी मिळाव्यात,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना वीज व पाणी मोफत मिळावे,नगरपालिका/महानगर पालिकांचे वेतन १०० टक्के शासनाकडून व्हावे,सर्व विद्यार्थ्यांना १०० टक्के गणवेश मोफत मिळावा,यापूर्वी झालेल्या गैरसोयीच्या प्रशासकीय बदल्या विनाअट आपसी व विनंतीने करण्यात याव्यात,मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करावी,१९७२ नंतरच्या अप्रशिक्षित सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन मिळावी,प्राथमिक शिक्षकांना बी.एल.ओ.ची कामे देण्यात येऊ नयेत,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची वयोमर्यादा वाढवण्यात यावी,आर.टी.ई.नुसार पाचवी व आठवी चे अर्ज जोडावेत,६ व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात,स्वयंअर्थ सहाय्य शाळांना परवानगी देऊ नये इत्यादी मागण्या केल्या आहेत. अशाप्रकारे  शिक्षकांच्या प्रलंबित समस्या आणि शिक्षणाचा कायदा अधिनियम २००९ मधील जाचक अटी दूर करण्यासाठी राज्य शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी हे एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनास जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन राज्य संघटक प्रतिभा पोळेकर,मारुती कळंबे,प्रसाद म्हात्रे,जिल्हाध्यक्ष श्री.भालचंद्र गोरेगावकर यांनी केले आहे.