पोलादपूर तालुका वाचनालयातर्फे वक्तृत्व स्पर्धा संपन्न
पोलादपूर (नितीन कळंबे)दि.८ – दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पोलादपूर
तालुका वाचनालयातर्फे होणारी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार
पडली.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रथम शाळेकडून निवड केली
गेली होती.”क्रांतिवीर” हा विषय असलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील १० शाळांचा
समावेश होता.ही स्पर्धा पाचवी,सहावी आणि सातवी अशा तीन गटात घेतली गेली.यापैकी
पाचवी मध्ये जनसेवा प्रतिष्ठान शाळेची कु.सानिका विकास कोसबे हिचा प्रथम
क्रमांक,सहावी मध्ये शंकरराव महाडिक
शाळेची कु.नताशा नितीन बोरकर हिचा प्रथम क्रमांक तर सातवी मध्ये रा.जि.प.शाळा चरई
ची कु.साक्षी संजय कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला.प्रथम क्रमांक येणाऱ्या
विद्यार्थ्यास मनगटी घड्याळ,द्वितीय क्रमांकास कंपासपेटी तर तृतीय क्रमांकास
मराठी,इंग्रजी व हिंदी भाषेतील निबंध पुस्तके असे बक्षिसांचे स्वरूप होते.
सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून एस.एम.महाविद्यालयाचे प्रा.सोमोशी
सर,विद्यामंदिर माध्यमिक शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.अस्मिता तलाठी यांनी काम
पहिले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरेश रा.शेठ यांनी भूषविले तर सूत्रसंचालन
जगन्नाथ मुजुमले गुरुजींनी केले.स्पर्धेचे नियोजन ग्रंथपाल निकिता शेठ,लिपिक संतोष
महाडिक,शिपाई कीर्ती नगरकर ,सदस्या प्रेमलता शेठ यांनी केले.
0 comments
Post a Comment