Monday, July 28, 2014

पोलादपुरचे सुपुत्र लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित “टपाल” चित्रपट लवकरच होणार प्रकाशित

पोलादपुरचे सुपुत्र लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित “टपाल” चित्रपट लवकरच होणार प्रकाशित

ब्लू,कौन बनेगा करोडपती,बॉस,इंग्लिश-विंग्लिश मध्ये 

सिनेमॅटोग्राफी लक्ष्मण उतेकर यांची

पोलादपूर(नितीन कळंबे) –मोबाईल,संगणक.सोशल मिडिया 

यांच्या जंजाळात पोस्टमन ही संकल्पना 

मागे पडताना दिसत आहे.मात्र खासकरून ग्रामीण जीवनात 

पोस्टमनच्या भावनिक वलय लाभलेल्या 

भूमिकेतून हृदयस्पर्शी,नात्यांची मार्मिक गुंफण असलेली कथा 

घेऊन टपाल हा चित्रपट २६ सप्टे.२०१४ 

रोजी प्रकाशित होत आहे. मैत्रेयी मास मिडिया यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाची कथा “टिंग्या 

फेम” मंगेश हाडवळे यांनी लिहिली असून वीणा जामकर,नंदू माधव,मिलिंद गुणाजी यांनी त्यात 

अभिनय केला आहे.

लक्ष्मण उतेकर हे पोलादपूर मधील मोरसडे या गावातील आहेत.”टपाल” या चित्रपटात प्रमुख भूमिका 


याच मोरसडे या गावातील दोन लहान मुलांनी केली आहे.या मुलांनी अभिनयाचे कुठलेही तांत्रिक 

शिक्षण घेतले नसतानाही लक्ष्मण उतेकर यांनी त्यांना संधी देऊन त्यांच्याकडून सशक्त अभिनय 

करवून घेतला आहे.यासाठी त्यांच्या अभिनयाच्या कार्यशाळेची जबाबदारी ही लक्ष्मण उतेकर यांनीच 

घेतली. स्वत: लक्ष्मण यांनीसुद्धा छायाचित्रणाचे कोणतेही तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले नाही.जयंत ब्रदर्स 

या स्टुडीओ मध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करत असताना कॅमेरा लोकेशन वर ने-आण करायची 

जबाबदारी त्यांची होती.त्यामुळे शुटींग संपेपर्यंत त्यांना लोकेशन वर थांबावे लागे,याच दरम्यान 

त्यांनी कॅमेरा हाताळणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आणि एकलव्याच्या भूमिकेतून त्यांनी १६ वर्षे 

मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर आज हिन्दी चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान मिळवले आहे.अमिताभ 

बच्चन यांच्या “कौन बनेगा करोडपती” च्या जाहिरातींचे चित्रण,”आयडिया” या कंपनीच्या 

जाहिरातीचे 

चित्रण तसेच अक्षय कुमार याच्या “ब्लू” आणि “बॉस” तसेच गौरी शिंदे यांच्या “इंग्लिश -विंग्लिश” 

इ.चित्रपटांचे छायाचित्रण लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.


चित्रपट रिलीज होण्याअगोदरच राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर याला भरभरून प्रतिसाद 

मिळाला.जानेवारी मध्ये पार पडलेल्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल आणि १२व्या पुणे 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला. पुणे इंटरनॅशनल फिल्म 

फेस्टीव्हलमध्ये मध्येसुद्धा या चित्रपटाला भरभरून पप्रोत्साहन मिळाले.इंडियन इंटरनेशनल फिल्म 

फेस्टिवल ऑफ साउथ आफ्रिका या पुरस्कार सोहळ्यात वीणा जामकर यांनी टपाल चित्रपटातील 

भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म 

फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  टपाल या 

चित्रपटाची निवड झाली आहे.  दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या भारतीय चित्रपट महोत्सवातही "टपाल" ची 

निवड झाली आहे. सिडनी, फ्रान्समधील वेसोल, अमेरिकेतील लॉस एंजिल्स, इटली, जर्मनी, चीन या 

देशांमधूनही "टपाल" ला निमंत्रण मिळाले आहे.



तालुक्यातील सुपुत्राने जगाच्या नकाशावर इतके दैदिप्यमान यश मिळवून सुद्धा स्थानिक प्रशासन 

याबाबतीत उदासीन दिसते.तालुक्यातर्फे त्यांचे कोणत्याही प्रकारचे कौतुक केले जात नाही.आमसभेत 

त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही कधी घेतला गेला 

नाही.त्यांच्या या यशाबद्दल सुद्धा अगदी 

मोजक्याच 


लोकांना माहित आहे.लोकप्रतिनिधींच्या निव्वळ 

“राजकारण एके राजकारण“ या भूमिकेमुळे 

अयोध्या 

असूनही लक्ष्मण वनवासीच असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. 

0 comments

Post a Comment