सद्गुरू दादामहाराज मोरे माऊली यांचा गुरुपोर्णिमा सोहळा उद्या
पोलादपूर(नितीन कळंबे)-महाराष्ट्र वारकरी महामंडळ मुंबई शाखेचे
अध्यक्ष वै.ह.भ.प.ज्ञानेश्वर मोरे माऊली यांचा अध्यात्मिक वारसा समर्थपणे पेलून
वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रभर प्रचार व प्रसार करणारे त्यांचे सुपुत्र
ह.भ.प.दादामहाराज मोरे माऊली यांच्या गुरुपोर्णिमेचा कार्यक्रम उद्या (दि.१७) रोजी
पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे हॉल मध्ये संपन्न होईल.
सद्गुरू मोरे माऊली वारकरी सेवा समिती(कोकण विभाग) यांनी आयोजित
केलेला हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता गुरुपरंपरेच्या अभंगांवर होणाऱ्या सांप्रदायिक भजनाने
सुरु होईल.११ वाजता ह.भ.प.ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या प्रतिमेचे अनावरण जिल्हा
परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते होईल यानंतर सद्गुरू दादामहाराज
मोरे यांच्या प्रवचनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.दुपारी एक ते दोन या वेळात
सद्गुरू दर्शन सोहळ्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी
सर्वांनी गुरुपुजनाच्या सोहळ्यास उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे
आवाहन सद्गुरू मोरे माऊली वारकरी सेवा समिती(कोकण विभाग) यांच्या मार्फत करण्यात
आले आहे.

0 comments
Post a Comment