Monday, July 7, 2014

शिक्षक समितीचे धरणे आंदोलन

शिक्षक समितीचे धरणे आंदोलन 

पोलादपूर\नितीन कळंबे (दि.२७)- शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती रायगड शाखेच्या वतीने दि.५ जुलै रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

शिक्षक समितीच्या वतीने याअगोदर शिक्षक व शिक्षणाच्या प्रश्नाकरता अनेक वेळा मा.मुख्यमंत्री,ग्रामविकास मंत्री,शिक्षणमंत्री यांची वारंवार भेट घेऊन चर्चा करून निवेदने दिली आहेत तरीसुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.यामध्ये संगणक परीक्षा मुदतवाढ मिळावी,२० पटाच्या आतील शाळा बंद करू नयेत,शालार्थ वेतन प्रणालीत सुधारणा व्हावी,उत्कृष्ट कामाच्या राज्य,राष्ट्रीय पुरस्काराच्या वेतनवाढी मिळाव्यात,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना वीज व पाणी मोफत मिळावे,नगरपालिका/महानगर पालिकांचे वेतन १०० टक्के शासनाकडून व्हावे,सर्व विद्यार्थ्यांना १०० टक्के गणवेश मोफत मिळावा,यापूर्वी झालेल्या गैरसोयीच्या प्रशासकीय बदल्या विनाअट आपसी व विनंतीने करण्यात याव्यात,मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करावी,१९७२ नंतरच्या अप्रशिक्षित सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन मिळावी,प्राथमिक शिक्षकांना बी.एल.ओ.ची कामे देण्यात येऊ नयेत,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची वयोमर्यादा वाढवण्यात यावी,आर.टी.ई.नुसार पाचवी व आठवी चे अर्ज जोडावेत,६ व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात,स्वयंअर्थ सहाय्य शाळांना परवानगी देऊ नये इत्यादी मागण्या केल्या आहेत. अशाप्रकारे  शिक्षकांच्या प्रलंबित समस्या आणि शिक्षणाचा कायदा अधिनियम २००९ मधील जाचक अटी दूर करण्यासाठी राज्य शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी हे एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनास जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन राज्य संघटक प्रतिभा पोळेकर,मारुती कळंबे,प्रसाद म्हात्रे,जिल्हाध्यक्ष श्री.भालचंद्र गोरेगावकर यांनी केले आहे.

0 comments

Post a Comment