Tuesday, July 8, 2014

सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्याच आरोग्याशी खेळ

सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्याच आरोग्याशी खेळ


महाड/नितीन कळंबे (दि.२) - महाड नगरपरिषदेतील आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांना गमबूट,हातमोजे इत्यादी साहित्य आरोग्यविषयक सुरक्षेसाठी दिलेले असतानाही सफाई-कर्मचारी मात्र त्याचा उपयोग करताना दिसून येत नाहीत त्यामुळे अनेक दुर्धर आजारांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सफाई करताना अनेक प्रकारच्या घटक जीवजंतुंशी कामगारांचा संपर्क येतो.सडलेले अन्न,कुजलेल्या भाज्या,जनावरांचे मलमूत्र,प्लास्टिक इत्यादी अनेक पदार्थ उचलताना सफाई कामगारांनी हातमोजे घालणे ही अत्यावश्यक बाब आहे तसेच तोंडावाटे जंतूंचे होणारे मार्गक्रमण रोखण्यासाठी नाक आणि तोंड  स्कार्फने झाकणे आवश्यक आहे.नाली-गटारांची सफाई करताना पायात कोणती वस्तू लागून जखमा होऊ नयेत म्हणून त्यांना गमबूट पुरवले जातात मात्र वरील साधने उपलब्ध असूनही महाड मधील सफाई कर्मचारी याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.याबाबत एका सफाई कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता गमबूट आणि हातमोजे घालणे ही त्याच्या दृष्टीने महत्वाची बाब नसल्याचे त्याने सांगितले त्यामुळे पुरवण्यात आलेल्या साहित्याबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक समुपदेशन करणे महत्वाचे बनले आहे.




0 comments

Post a Comment