खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता
पोलादपूर(नितीन कळंबे )- पोलादपूर येथील प्रभातनगर मध्ये हॉटेल गोल्डन पेलेस च्या बाजूने सहानेकडे जाणारा कच्चा रस्ता एका खड्यामुळे धोकादायक बनला आहे.सदर खड्डा हा आकाराने जरी मोठा नसला तरीसुद्धा येथील लहान विद्यार्थ्यांची ये-जा बघता हा चिंतेच्या विषय ठरत आहे.
हा खड्डा गटावरील स्लब तुटल्यामुळे तयार झाला आहे.आकाराने इतका मोठा नसला तरी आतमध्ये पाय पडल्यास सळईमध्ये अडकून पाय मोडण्याची भीती आहे .इथून केवळ दहा पाऊले अंतरावर सिद्धगिरी संस्थेची यशवंतराव इंग्लिश मेडियम ही शाळा आहे.त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मुले येथून ये-जा करतात.तसेच प्रभातनगर,हनुमान नगर,भैरवनाथ नगर सिद्धार्थनगर येथील मुले जनसेवा प्रतिष्ठान,तालुका शाळेत जाताना मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर हाच रस्ता वापरतात तसेच नागरिक बाजारपेठेत जाताना सर्रासपणे याच रस्त्याचा वापर करतात.
रामजानकी अपार्टमेंट तसेच शगुन अपार्टमेंट मधील मुले येथे खेळताना दिसून येतात त्यामुळे कोणती अनुचित घटना घडण्याआधी ग्रामपंचायतीने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

0 comments
Post a Comment