राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वर्षासहल उमरठ येथे संपन्न
पोलादपूर (नितीन कळंबे) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी
वर्षासहलीचे आयोजन करण्यात येते.एखादे ऐतिहासिक स्थळ निवडून त्याठिकाणी
व्याख्याने,विविध खेळ यांचे आयोजन केले जाते.
गेल्यावर्षी मुरुड येथील कोर्लई किल्ल्यावर वर्षासहलीचे आयोजन करण्यात
आले होते,तर या वर्षी पोलादपूर तालुक्यातील उमरठ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे
यांच्या समाधीस्थळी ही वर्षासहल संपन्न झाली.परवा (दि.२६)रोजी रायगड जिल्हा
महाविद्यालयीन प्रमुख कौस्तुभ सोहनी यांनी व्याख्यानाद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाची कार्यपद्धती स्वयंसेवकांना समजावून सांगितली.दि.२७ रोजी सकाळी मैदानात
कबड्डी,कुस्ती सारखे मर्दानी खेळ खेळण्यात आले.यानंतर वर्षासहलीची सांगता पराग
कंगले (बौद्धिक प्रमुख-कोकण प्रांत) यांच्या व्याख्याने झाली.व्याख्यानामध्ये
त्यांनी आगामी काळातील भारतासमोरील आव्हाने यावर स्वयंसेवकांशी संवाद
साधला.मा.चंद्रकांत कळंबे (जि.प.उपाध्यक्ष) यांनी उपस्थित स्वयंसेवकांना नरवीर
तानाजी मालुसरे यांचा इतिहास समजावून सांगितला.याप्रसंगी संपूर्ण रायगड
जिल्ह्यातून १३० स्वयंसेवक उपस्थित होते.
0 comments
Post a Comment