अन दगडचं देव होऊन मदतीला धावला ...!
अपघातात थोडक्यात टळले जीवावरचे संकट
याबाबत सविस्तर वृत्त असे की,शनिवारी सकाळी राजेंद्र चव्हाण(वय २५) हा आपली महिंद्र बोलेरो गाडी(MH-०६ AN८६ ) घेऊन सकाळी सव्वा आठ वाजता महाळुंगे या गावापासून कापड्याकडे निघाला होता.गाडीमध्ये सुधाकर चव्हाण व त्यांची पत्नी तसेच लक्ष्मण चव्हाण हे साठ वर्षीय गृहस्थ होते.महाळुंगे गावापासून १ किलोमीटर प्रवास झाल्यावर गाडीचे ब्रेक फेल असल्याचे चालक राजेंद्रच्या लक्षात आले मात्र प्रसंगावधान राखून त्याने दुसऱ्या बाजूला गाडी जोरात वळवली मात्र दुसऱ्या बाजूला गाडी खड्ड्यात आदळून उलट्या दिशेला म्हणजे दरीच्या दिशेला वळली इतक्यात त्या सत्तर फुट दरीच्या वरच्या बाजूला असणाऱ्या मोठ्या दगडाला गाडी जोरात धडकली,पुढील उजव्या बाजूच्या टायरखाली तो दगड घुसून गाडीच्या खालचा भाग तुटला आणि मातीत रुतून बसला आणि गाडी जागीच थांबली.समोर आ वासून बसलेली प्रचंड खोल दरी आणि गाडीत पूर्णत: निशब्द वातावरण आणि धडधडती हृदये.एका क्षणात मृत्यूला चकवा देणाऱ्या माणसांची झालेली अवस्था हि शब्दांत मांडणे कठीण आहे.
मात्र यादरम्यान गाडीचा दरवाजा उघडला जाऊन लक्ष्मण चव्हाण हे साठ वर्षीय गृहस्थ बाहेर फेकले गेले यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.त्यांना तत्काळ इस्पितळात नेण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे डॉक्टरनी सांगितले.

0 comments
Post a Comment