पोलादपूर ते दाभीळ वस्तीची एस.टी. सेवा सुरु
पोलादपूर\नितीन कळंबे(दि.२५) - राज्य परिवहन महामंडळाची पोलादपूर ते दाभीळ वस्तीची बससेवा आज (दि.२५) रोजी सुरु करण्यात आली.बसची वेळ संध्याकाळी सहाची निश्चित करण्यात आली आहे.या बस-सेवेचे उद्घाटन नारळ वाढवून जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलादपूर पासून साधारण १५ किलोमीटर अंतर असणाऱ्या या गावांत वस्तीची एस.टी.नव्हती त्यामुळे संध्याकाळी दाभीळ गावी जाण्यासाठी लहुळसे एस.टी. पकडून तिथून १ किलोमीटर दाभीळ मध्ये चालत जावे लागे तसेच पोलादपूर ठिकाणी कॉलेज शिकणारे विद्यार्थी आणि देवळे गावी हाय-स्कूल मधील विद्यार्थी यांच्या वेळेचा नाहक अपव्यय होऊन त्यांची गैरसोय होत होती.त्यामुळेच ही बस सेवा प्रामुख्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबावी यासाठीच सुरु करण्यात आल्याचे प्रताप कुमठेकर यांनी छोटेखानी भाषणामध्ये सांगितले.याप्रसंगी शिवसेनेचे देवळे गावचे सरपंच प्रकाश कदम ,निलेश आहिरे,लक्ष्मण मोरे,गुणाजी दळवी ग्रा.पं.सदस्य दाभीळ,गणेश कळंबे तसेच आगारप्रमुख आबा दरेकर आणि महाड आगाराचे शिवाजी जाधव हे उपस्थित होते.ही एस.टी. सुरु झाल्याने दाभीळच्या गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

0 comments
Post a Comment